लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज?

बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
मुंबई : बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती. लग्नाच्या तीन वर्षानंतर आता अंकिताकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये व्यावसायिक विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता-विकीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लाफ्टर शेफमध्ये विकी-अंकितासोबत सहभागी असलेल्या अली गोनी यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आले आहे. छोटा जैन येणार असल्याचे तो एका व्हिडीओत बोलताना दिसून आला आहे.
सोशल मीडियावर ऑफ कॅमेरा शूट झालेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लाफ्टर शेफची सगळी टीम निवांत बसले असून त्यांची थट्टा मस्करी सुरू आहे. त्याच वेळी गोनी अली अंकिता-विकीला उद्देशून बोलताना म्हणतो की, छोटा जैन येतोय, छोटा जैनी येतोय... हे ऐकल्यानंतर विकी जैनही हसताना दिसतोय.
या व्हिडीओवर चाहत्यांमध्ये अंकिताच्या प्रेग्नेंसीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याची पुष्टी अद्याप झाली नाही.