वाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे.
महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणार्या आमच्याच महायुतीच्या आमदारा विरोधात आता आम्ही सर्व शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. यापुढील काळात आमदाराच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये.
वाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.
आनेवाडी टोलनाक्यानजीक झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील विरमाडे येथील सैन्य दलात असलेल्या विजय श्रीरंग सोनावणे (वय 37) या जवानाचा मृत्यू झाला.
महाबळेश्वर येथील हॉटेल व्यज्ञवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांस अटक करण्यात आली आहे. त्यांस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे अर्ज छाननी नंतर राज्यसभेचे बिनविरोध खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन काकांच्या खासदारकीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची नवी इनिंग सुरू होणार आहे आणि त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार मिळणार आहे.