फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आदर्की खुर्द) चा कुस्तीपटू पै. ओंकार रमेश ठोंबरे याने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून सातारा जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
सविस्तर वृत्तस्वर्गीय यशवंतराव चव्हाण कण्हेर बीटच्या बीटस्तरीय बालक्रिडा स्पर्धा रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय अंबवडे बुद्रुक ता.सातारा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.
सविस्तर वृत्तकॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके, गाथा आनंदराव खडके आणि शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी कांस्य पदक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे.
सविस्तर वृत्तगेल्या चार वर्षात 15 वर्षाखालील वयोगटात स्पर्धांचे आयोजनच न झाल्यामुळे या खेळाडूंचे नुकसान होत होते. परंतू महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा संघाच्या 32 बॉक्सरच्या चमूने 23 पदके पटकावली.
सविस्तर वृत्तटीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
सविस्तर वृत्तभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचला आहे. नीरजनं 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली.
सविस्तर वृत्तचीनमधील शांघाय येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज-२ स्पर्धेत ५० मीटर कंपाउंड राउंड या प्रकारात छत्रपती शिवाजी कॉलेजची खेळाडू मधुरा धामणगावकर हिने वैयक्तिक प्रकारात एक सुवर्णपदक, सांघिक माहिला गटात एक रौप्य, तर महिला मिश्र गटात एक कांस्यपदक भारतासाठी पटकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वीपणे सुरुवात केली.
सविस्तर वृत्तपंधरा वर्षाखालील मुला-मुलींच्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये सातारच्या समृद्धी शिंदे आणि यश निकम यांची निवड बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया समिती यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पुरस्कारांची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्त