कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर आज मंदावला. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याची आवक कमी झाली नसल्याने काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर ठेवले आहेत.
कोयना धरणांतर्गत जलाशयात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 19,568 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 86.04 टीएमसी झाला आहे.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मारूल हवेली परिसरातील गावात बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यावर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.
महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पायथा वीजगृृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाटण - सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाट मार्गावर चालकाचा ताबा सुटून गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना बुधवारी घडली.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 19,181 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.
पंढरपूरच्या वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी घरफोडी करून बंद घरातील आठ तोळे सोने व वीस हजार रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला असून अद्यापही पाऊस न थांबल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य शेतकर्यांना आपल्या शेतीत पेरणीच करता आली नाही.