घरगुती गणपती व गौरी विसर्जनानंतर सोमवारपासून कराड शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले झाले. मंगळवारी शहरातील बहुतेक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले.
अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड - सातारा मार्गिकेवर रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.
चारित्र्याच्या संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्या कामांची अजून भूमिपूजन व उदघाटन सुरु आहेत, विकास हेच ध्येय ठेवून पदाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून आपले आयुष्य व्यतीत करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.
माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती मतदार संघातील वाढीव मतदार तसेच दुबार मतदार नोंदणीची चौकशी करत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहा फुटापासून सुमारे तीस फुटाच्या जवळपास २०० हून अधिक गणेश मुर्ती पाण्यात भिजून वाहून जाण्याची शक्यता होती. त्यातून मोठ्या नुकसानीसह संकट कराडवर ओढवणार होते.
कापील तालुका कराड येथील बोगस मतदार यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. व यास जबाबदार असणार्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करावी या मागणीसाठी 14 ऑगस्ट पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले कापील ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या बेमुदत उपोषणास राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देऊन गणेश पवार यांना पाठिंबा देण्यात आला.
कराड शहराच्या सुशोभिकरणासाठी उभारण्यात आलेली बंद असलेली कारंजी तात्काळ कार्यान्वित करावीत. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल.