खंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे हीचा असल्याचे समजल्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करणेत आला आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पुरुषोत्तम जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तालुक्यांच्या नात्यांची बेरीज केली आहे. त्यांचे सुपुत्र शुभंकर व महाबळेश्वरच्या कोंढाळकर घराण्यातील सायली लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. कै. ह. भ .प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे नातू व पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांचे चिरंजीव चि.शुभकंर पुरूषोत्तम जाधव रा. अतिट ता .खंडाळा जि.सातारा आणि महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष हे मूळचे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील बोरगाव येथील आहेत लक्ष्मण कोंढाळकर यांची नात व बाळकृष्ण कोंढाळकर यांची कन्या सायली यांचा महाबळेश्वर येथे आज कुंकुम तिलक सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामुळे खंडाळा तालुका आणि वाई महाबळेश्वर तालुक्याचे नाते दृढ झाले आहे.
मालट्रकने चार गाड्यांना उडविले हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..