डोळ्यात आग अन् हातात कुऱ्हाड

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित बनत असलेल्या ‘छावा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित बनत असलेल्या ‘छावा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विकी कौशलच्या ‘महावतार’ या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या पौराणिक चित्रपटात विकी चिरंजीवी परशुरामची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्याचा हा लुक पाहून चाहते चकित झाले आहेत.
कधी होणार ‘महावतार’ प्रदर्शित
विक्की कौशलचा आगामी चित्रपट ‘महावतार’ हा दिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनत आहे. अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अलीकडेच, ‘महावतार’ मधील विकी कौशलचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामध्ये हा अभिनेता वाढलेली दाढी-मिशी आणि लांब केसांसह खूपच आकर्षित दिसत आहे, यासोबतच त्याने हातात कुऱ्हाडी धरली आहे. या चित्रपटात विकी कौशल भगवान परशुरामची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी ‘महावतार’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. खरंतर हा चित्रपट 2026 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलच्या या पोस्टवर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.
‘महावतार’मधील विकी कौशलच्या लूकवर लोकांच्या प्रतिक्रिया
महावतार चित्रपटातील विक्की कौशलचा हा लूक लोकांना आवडला आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा हा तडफदार लूक पाहून चाहत्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विकी कौशलच्या लूकवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, ‘किती अप्रतिम लूक आहे, फक्त तोच याला न्याय देऊ शकतो.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘भाऊ एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहे.’ विकी कौशलच्या या लूकचे कौतुक करताना आणखी एका यूजरने लिहिले की, ‘विक्कीला भगवान परशुरामची भूमिका करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. त्याने आदिपुरुषसारखी मोठी चूक करू नये.’ असे लिहून अनेक चाहत्यांनी अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे.
अभिनेत्याचा आगामी चित्रपट
कामाच्या आघाडीवर, विकी कौशल लवकरच ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘छावा’ येत्या ६ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शूर पराक्रमावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आणि त्यांच्या पत्नी येसूबाईची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदान्ना साकारणार आहे.