नरेशी मीणा होऊ शकली नाही केबीसीची पहिली करोडपती

16 व्या सीजनमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत नरेशी मीणा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांची काहणी ऐकून अमिताभ बच्चनसह स्टुडिओमधील अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु मीना एक कोटी जिंकू शकल्या नाहीत. एक कोटीसाठी असलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आली नाही अन् 50 लाख घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.
मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोड़पति 16’ सुरु झाला आहे. या 16 व्या सीजनमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत नरेशी मीणा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांची काहणी ऐकून अमिताभ बच्चनसह स्टुडिओमधील अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु मीना एक कोटी जिंकू शकल्या नाहीत. एक कोटीसाठी असलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आली नाही अन् 50 लाख घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.
‘कौन बनेगा करोड़पति 16’ शो मध्ये येताच नरेशी मीणा यांनी ब्रेन ट्यूमरसारखा आजार झाला असल्याचे सांगितले. त्या आजाराचे त्यांनी उपचार केले होते. परंतु हा आजार पूर्णपणे बरा झाला नाही. त्यासाठी आता पुन्हा पैसे लागणार होते. त्यामुळे पुढील उपचार थांबवले होते. आता या शोमधून मिळणाऱ्या पैशांनी त्या आजाराचे उपचार पुन्हा करणार आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी नरेशी यांचा आत्मविश्वास पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
नरेशी यांचा 1 कोटीचा प्रश्नाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, आजच्या शोसाठी तुम्ही जितक्या एक्साइटमेंट असला तितक्या चिंतत असणार आहेत. 50 लाख तुम्ही जिंकले आहेत अन् 1 कोटीसाठी दावेदारी आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नरेशी यांना 1 कोटींचा प्रश्न विचारला. “लीला राव दयाल किसे हराकर विंबलडन टेनिस चैंपियनशिप का एक सिंगल्स मैच जीतने वाली पहली भारतीय महिला बनी थीं?” त्यासाठी पर्याय दिले होते, ए- लॉटी डॉड, बी- ल्गॅडिस साउथवेल, सी- मे सेटन आणि डी – किट्टी गॉडफ्री.
नरेशी मीणा या प्रश्नात कंन्फ्यूज होत्या. त्यामुळे त्यांनी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांना तुम्ही काय उत्तर दिले असते? असे विचारले तेव्हा त्यांनी ए- लॉटी डॉड म्हटले. परंतु ते चुकीचे उत्तर होते. त्याचे योग्य उत्तर बी- ल्गॅडिस साउथवेल होते. त्यानंतर नरेशी 50 लाख रुपये घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एंडा येथील नरेशी मीणा आहेत. 27 वर्षीय नरेशी मीणा यांना 2018 मध्ये ब्रेन ट्यूमर झाला होता. 2019 मध्ये त्यांनी ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया केली. त्यासाठी आईचे दागिने विकले होते. परंतु त्यानंतरही ब्रेन ट्यूमर पूर्ण बरा झाला नाही.