स्वप्नील घेऊन येत आहे हास्याची अनोखी जत्रा

नवीन वर्षाची सुरुवात स्वप्नीलने गूढ आणि गोड ‘जिलबी’ या चित्रपटाच्यासोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
नवीन वर्षाची सुरुवात स्वप्नीलने गूढ आणि गोड ‘जिलबी’ या चित्रपटाच्यासोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नीलने नव्या वर्षात चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाची घोषणा केल्या नंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याचं समोर आले आहे. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाचा टीझर मध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठली ही असो स्वप्नील ती भूमिका करण्याचं आव्हानं पेलून तिला किती उत्तम बनवता यईल याकडे लक्ष देऊन काम करतो. ‘जिलबी’ मधला रांगडा करारी लूक असलेला पोलीस अधिकारी ते ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो यात शंका नाही.
रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख ही करून देण्यात आली आहे. या म्हणींची भानगड आणि त्यामागची गंमत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे कलाकार दिसणार असून, यासोबतच नम्रता संभेराव,वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकारही चित्रपटात धमाल आणणार आहेत. जिलबी, चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील अनोख्या भूमिकेत दिसणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.