'छावा'नंतर रश्मिका घेणार रिटायरमेंट?

सध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. काल 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. काल 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलर रिलीजला दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल उपस्थित होता. 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे.
रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली असूनही रश्मिका मंदाना ट्रेलर लाँचला उपस्थित राहिली. रश्मिका ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी हैदराबादहून प्रवास करून मुंबईत आली. रश्मिकाने ट्रेलर लाँचच्या वेळी आपल्या महाराणी येसूबाईंची भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या. तिच्या बोलण्याने सर्वच भारावून गेले.
रश्मिका मंदाना म्हणाली की, "मला आयुष्यात एकदा तरी अशी भूमिका करायची होती. त्यामुळे मला ही संधी गमवायची नव्हती. माझ्या आयुष्यातील हा सर्वात खास सिनेमा आहे. माझ्या पायाला दुखापत झाली असूनही मी फक्त या सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी हैद्राबाद ते मुंबई प्रवास केला आहे. मला ही संधी सोडायची नव्हते. मला काहीही करून यायचेच होते. मी ही भूमिकेल्या न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मला नाही माहित की, लक्ष्मण सरांनी माझ्यात काय पाहिले. मी तुमच्या कुटुंबाचा भाग झाले आहे. "
शेवटी रश्मिका मंदाना म्हणाली की, "दाक्षिणात्य अभिनेत्रीला महाराणी येसूबाईची भूमिका साकारायला देणे ही खूप खास गोष्ट आहे. मी लक्ष्मण सरांना बोली होती की, महाराणी येसूबाईची भूमिका केल्यानंतर मी आनंदाने निवृत्ती घेईन. मी रडणारी व्यक्ती नाही. पण हा ट्रेलर पाहून मी खूप भावुक झाली आहे." धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.