छत्रपती संभाजीनगरमधील ‘ग्रँड सरोवर’ हॉटेलला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ग्रँड सरोवर या हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ग्रँड सरोवर या हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर-धुळे हायवेवर तिसगाव येथील ग्रँड सरोवर हॉटेल आहे. या हॉटेलला भीषण आग लागली आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते आहे.
अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे हॉटेलचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर येत आहे. आगीचे, धुराचे लोट दूरवर पसरल्याचे पाहायला मिळत होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप संजू शकलेले नाही. हॉटेलक्या किचनमधून ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.