"महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न !

येथील परिवर्तनवादी चळवळीचे साहित्यिक आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांच्या, "महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील एल.बी.एस कॉलेजजवळील मुक्तांगणमध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा : येथील परिवर्तनवादी चळवळीचे साहित्यिक आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांच्या, "महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील एल.बी.एस कॉलेजजवळील मुक्तांगणमध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ गझलकार व कवी प्रा.डॉ. आबासाहेब उमाप होते. अध्यक्षस्थानी कवी व विचारवंत प्रा.डॉ. प्रदीप शिंदे होते. सदरच्या कार्यक्रमास प्रा.दत्तात्रय जाधव, संजीव बोंडे,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.उपस्थीत असणाऱ्या मान्यवरांना, "महाआतंक" या पुस्तकाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या.
कविसंमेलन : कु.सौम्या आणि कु.काव्या यांनी विनायक आफळे या त्यांच्या आजोबांनी केलेल्या रचना मधुर आवाजात वाचन केल्या. शिवाय, जिल्ह्यातील निमंत्रित कविंचे कविसंमेलनही दुपारी सुरू झालेले सायंकाळी उशिरापर्यंत रंगतदार झाले. त्यामध्ये कवी रवी आफळे, शिरीष जंगम आनंदा ननावरे, दिलीप महादार,विजय पवार, गौरव भंडारे,शशिकांत बडेकर, मिथून गायकवाड, आविष्कार गायकवाड,सौ.सुवर्णा पाटुकले, अजीज शेख व सत्तार शेख हे कवी उपस्थित होते. राहणार आहेत. प्रा.मंगला साठे व सौ.अनिता भोसले यांनी स्वागत केले. प्रा.आनंद साठे यांनी हजरजबाबी व नीटनेटकेपणा ठेवून सूत्रबद्ध असे सूत्रसंचालन केले. संभाजी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.