झोका बांधताना गळफास लागून मुलाचा मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी, विश्वजित हा इयत्ता 6 वीमध्ये शिकत होता. मंगळवारी दुपारी तो घरात खेळत असताना त्याची आई पल्लवी यांनी त्याला पतसंस्थेत पैसे काढायला चल, असे सांगितले.
सातारा : याबाबत मिळालेली माहिती अशी, विश्वजित हा इयत्ता 6 वीमध्ये शिकत होता. मंगळवारी दुपारी तो घरात खेळत असताना त्याची आई पल्लवी यांनी त्याला पतसंस्थेत पैसे काढायला चल, असे सांगितले. मात्र, विश्वजितने त्याला नकार देत तू पैसे घेऊन ये, मग नंतर नागठाणे येथे बाजाराला जाऊ, असे सांगितले. आई पतसंस्थेत गेल्यानंतर विश्वजित लोखंडी अँगलला
साडीचा झोका बांधत होता. साडी बांधत असताना अचानक त्याचा गळा साडीत अडकल्याने गळफास लागला. यावेळी घरात कोणी नसल्याने त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. गळफास लागून विश्वजीत खाली पडल्याचा आवाज ऐकू आल्यामुळे शेजारच्यांनी घरात धाव घेतली. त्यांनी विश्वजीतच्या आईला फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर आईने तात्काळ घरी गेली. मात्र, त्यापूर्वीच विश्वजीतचा मृत्यू झाला होता. या घटनेने चव्हाण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याबाबत वडील अजय चव्हाण यांनी फिर्याद दिल्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.