ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना स्नेहभोजन

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रंग प्रवाह नाट्य संस्था, कलर्स फाउंडेशन, निर्मिती सोशल ग्रुप यांच्यावतीने नगरपालिका शाळा क्रमांक ६ कात्रेवाडा मंगळवार पेठ, सातारा.
सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रंग प्रवाह नाट्य संस्था, कलर्स फाउंडेशन, निर्मिती सोशल ग्रुप यांच्यावतीने नगरपालिका शाळा क्रमांक ६ कात्रेवाडा मंगळवार पेठ, सातारा या शाळेतील विध्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इमरान मोमीन, मार्गदर्शक अमर मोकाशी, मनीष काशीद, प्रथमेश देवकर, अख्तर शेख, ऋषिकेश गंगावणे, इरफान शेख, कुमार अवघडे, नितीन सूर्यवंशी, सादिक आंबेकरी, इर्शाद बागवान, सागर जाधवराव आदी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असून आगामी काळातही गोर- गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी साहाय्य करण्यात येणार असल्याचे मोमीन याप्रसंगी म्हणाले.