रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली

रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे.
रायगड : रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही.
महत्वाचे म्हणजे वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात आली कशी तेही गुजरातची. नक्की प्रकार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सदर घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलीस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.
सीआयएसएफ आणि नौदलाच्या गस्त नौकांद्वारे बचावकार्य करण्यात आले. कोळी बांधवांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग, कस्टम आणि पोलिसांनी या घटनेवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे.