…तर फलटणकर अन् माणमधील चार नेते तुरुंगात असते

मला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले परंतु जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे या गोष्टींचा विशेष फरक पडला नाही. नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही मी कोणाला त्रास दिला नाही.
खंडाळा : ‘मला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले परंतु जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे या गोष्टींचा विशेष फरक पडला नाही. नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवलं असतं तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातले किमान चार नेते तुरुंगात असते,’ असे टीकास्त्र ग्रामविकास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला.
अहिरे (ता. खंडाळा) येथे सोमवारी दिवंगत अविनाश धायगुडे पाटील विकास सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, विराज शिंदे, शशिकांत पिसाळ, चिन्मय कुलकर्णी, अनिरुद्ध गाढवे, हर्षवर्धन शेळके, अतुल पवार, प्रदीप माने, दीपक ननवरे, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, सहाय्यक निबंधक प्रीती काळे उपस्थित होत्या.
माजी आमदार मदन भोसले म्हणाले, ‘कोणीतरी असं म्हणत आहेत की आम्ही ऋषीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पाऊल टिकू देणार नाही. पण उपस्थित जनसमुदाय पाहिल्यानंतर ही गोष्ट अशक्य दिसून येते.’
यावेळी लोणंद कृषी उत्पन्न समितीचे संचालक बाळकृष्ण रासकर, सुखेडचे माजी उपसरपंच तात्यासाहेब पडळकर यांच्यासह शेकडो युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी खंडाळा तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह, खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.