भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार नवे हत्यार
भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवे हत्यार येणार असून, त्यामुळे लष्कराची लढाईचे बळ वाढणार आहे. ड्रोनद्वारे मिसाईल सोडून लक्ष्यभेद करण्यात डीआरडीओला यश आले आहे.
दिल्ली : भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवे हत्यार येणार असून, त्यामुळे लष्कराची लढाईचे बळ वाढणार आहे. ड्रोनद्वारे मिसाईल सोडून लक्ष्यभेद करण्यात डीआरडीओला यश आले आहे. अचूक निशाणा लावत शूत्रंचा खात्मा करणाऱ्या या नव्या शोधाबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला ड्रोनद्वारे मिसाइलचा मारा करून लक्ष्याचा भेद करण्यात यश आले आहे. डीआरडीओने आंध्र प्रदेशातील ड्रोनद्वारे मिसाईलची यशस्वी चाचणी केली.
डीआरडीओने कुरूनूलमध्ये UAV प्रिसिजन गाईडेड मिसाईलची (ULPGM-V3) चाचणी केली. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. यामुळे देशातील मिसाईल क्षमता विकास कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
"भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये नॅशनल ओपन एरियातील रेंजमध्ये प्रिसिजन गाईडेड मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ULPGM-V3 सिस्टिम वजनाने हलकी, अचूक आणि हवेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने करता येईल अशा पद्धतीने विकसित करण्यात आली आहे", असे राजनाथ सिंह म्हणाले.
ये यशाने हे सिद्ध झाले आहे की, भारतीय उद्योग आता महत्त्वाची संरक्षण तंत्र प्रणाली विकसित करण्यास सज्ज झाली आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.