परळीत दारु अड्ड्यावर छापा, १२ बाटल्या जप्त
परळी (ता. सातारा) येथे रहात्या घराच्या आडोशाला सुरु असणाऱ्या देशी दारु अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९६० रुपयांच्या देशी दारुच्या १२ बाटल्या जप्त केल्या आहेत.
सातारा : परळी (ता. सातारा) येथे रहात्या घराच्या आडोशाला सुरु असणाऱ्या देशी दारु अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९६० रुपयांच्या देशी दारुच्या १२ बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सुजाता राहुल गंगावणे (रा. परळी, सातारा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सातारा तालुका पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.