सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू
सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवान असलेले गणपत मारुती फाळके वय 62 वर्ष राहणार हरपळवाडी तालुका कराड हे कारागृहात आजारी असताना त्यांना ११ जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवान असलेले गणपत मारुती फाळके वय 62 वर्ष राहणार हरपळवाडी तालुका कराड हे कारागृहात आजारी असताना त्यांना ११ जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 17 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक बी खुटे यांनी पोलिसांना दिले आहे. प्राथमिक तपास संगीता अल्फान्सो सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी केला असून अधिक तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत.