बोरगाव वारनानगर येथून महिला बेपत्ता
सातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले.
सातारा : सातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत त्यांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नसल्याने त्यांचे पती बाबुराव संपत पाटील (वय ६० वर्ष) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंग ची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांनी दिली आहे.