विधानसभा निवडणुक २0२४ साठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आाहे. पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, कराड उत्तर १, सातारा मतदारसंघासाठी १ अशी एकूण ६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
सातारा : विधानसभा निवडणुक २०२४ साठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आाहे. पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, कराड उत्तर १, सातारा मतदारसंघासाठी १ अशी एकूण ६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. सातारा जिल्ह्यातून २२६ अर्जांची विक्री करण्यात आली आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदार संघासाठीे पहिल्या दिवशी वसंत मानकुमारे, आ. शिवेंद्रराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले, रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ, अभिजित बिचुकले, सागर भिसे आदी १३ जणांनी १६ जणांसाठी एकूण २९ अर्ज खरेदी केले. यापैकी सातारा-जावली विधानसभेसाठी आतापर्यंत सागर शरद भिसे यांनी अर्ज भरला आहे.
पाटणला पहिल्या दिवशी १४ जणांनी २५ अर्जांची खरेदी केली. मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिकराव दिनकर पवार, रा. गोटे (ता. कराड) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पहिल्या दिवशी १५ जणांनी एकूण २३ नामनिर्देशनपत्रे घेतली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकूण २५ जणांनी ३० नामनिर्देशनपत्रे घेतली.
कोरेगाव मतदारसंघात महेश माधव कांबळे, रा. महागाव आणि ऋषिराज जगन्नाथ कणसे, रा. अंगापूर वंदन यांनी अपक्ष अर्ज भरले. एकूण ४३ अर्जांची विक्री झाली.
फलटण विधानसभा मतदारसंघासाठी २३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. विडणी येथील हरिभाऊ रामचंद्र मोरे व सांगवी येथील रवींद्र रामचंद्र लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
माण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी एकूण ३५ जणांनी २५ अर्ज नेले. तथापि, आज कोणी अर्ज भरला नाही. माण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी एकूण ३५ जणांनी २५ अर्ज नेले. तथापि, आज कोणी अर्ज भरला नाही. वाई मतदारसंघातून १८ जणांनी २१ अर्ज नेेले. तथापि, कुणीही अर्ज दाखल केला नाही.