फेब्रुवारी 2023 मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, डॉक्टरांनी फोनवरुन सांगून ही प्रसूती कम्पाउंडरने केली. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, फेब्रुवारी 2023 मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, डॉक्टरांनी फोनवरुन सांगून ही प्रसूती कम्पाउंडरने केली. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
गुन्हा नोंद झाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे तेलतुंबडे यांनी न्यायालयात आरोपींना जामीन मिळावा, यासाठी मदतच केली. त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक आणि उच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या जागेवर तपासी अधिकारी म्हणून सातारा तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान उच्च न्यायालयानेही आरोपींवर खुनाचा गुन्हा का लागू केला नाही, असे म्हटले. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे संशयितांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन याला स्थगिती मिळवली. त्याचाही निकाल लागला असून, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश दिलेला आहे. यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही न्यायालयीन लढाई जिंकली आहे. आता मुख्य लढाई ही पोलिसांच्या हातात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात योग्य दोषारोप पत्र सादर करावे, तसेच डॉ. घाडगेंवर निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरुन न्यायालयीन निकाल लागेपर्यंत अशी दुर्दैवी घटना त्यांच्याकडून घडणार नाही. अन्यथा आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.