परळी खोर्यात वन्य प्राण्यांचे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
परळी : परळी खोर्यात वन्य प्राण्यांचे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
केळवली येथे धोंडीबा केरेकर व मंथन कदम हे भैरीचा पट्टा या गावरान मालकी क्षेत्रात आपल्या गायी व बकरी चरत होत्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान या बकरींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यातून केरेकर यांनी बकरीला वाचवले आहे. मात्र, यामध्ये बकरी गंभीर जखमी झाली आहे. गत आठवड्यातही एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे डोंगरपट्ट्यातील शिवारात गाई म्हशी घेऊन जाण्यास शेतकरी घाबरत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांच्या त्रासापासून पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.