'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.
सातारा : 'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.
सातारा शहरातील शहापूर माध्यमातून राजवाडा टाकीद्वारे पाणी वितरण होणाऱ्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, गुरुवार, दि. १९ डिसेंबर पासून सकाळ सत्रातील पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरु राहील. दरम्यान दुपार सत्रातील होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात यावा, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले.