महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा-जावलीचे लोकप्रतिनिधी व बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड या ठिकाणी जावलीकरांनी जल्लोषात स्वागत केले.
पाचवड : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा-जावलीचे लोकप्रतिनिधी व बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड या ठिकाणी जावलीकरांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांसह मान्यवर भारावून गेले.
रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रिमहोदयांचे जावलीच्या प्रवेशद्वारावर आगमन होणार असल्याची माहिती समाज माध्यमातून मिळाली. त्यामुळे करहर, मेढा, सायगाव, आलेवाडी, शेते, बामणोली, विवर कावडी, म्हसवे, सरताळे, अमृतवाडी व दरे, सोनगाव, कुडाळ परिसरातील अनेक कार्यकर्ते महामार्गावर थांबले होते. पाच तासाच्या विलंबानंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.
मंत्री शिवेंद्रराजे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व जे.सी.बी.च्या साह्याने पुष्पहार घालून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत केले. या वेळेला वसंतराव मानकुमरे, दत्ता गावडे, सतीश चव्हाण, रविंद्र परामणे, गोपाळ बेलोशे, धैर्यशील शिंदे, राजेंद्र शिंदे, श्रीमती गीता लोखंडे, विक्रम भिलारे, राजू गोळे, हेमंत शिंदे, संजय शिंदे, सयाजी शिंदे, भाऊसाहेब जंगम, संदीप गायकवाड, प्रशांत कदम, जमीर शेख, सोहिल मुल्ला, शब्बीर भाई पठाण, अर्जुन निकम, मुरलीधर शिंदे, हिंदुराव तरडे, अभिजीत दुदूस्कर, संदीप गायकवाड, संदीप परामणे यांच्यासह ग्रामीण भागातील महायुतीचे समर्थक व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परंतु मंत्री महोदयांच्या सत्काराच्या व स्वागताच्या आनंदाच्या वातावरणामध्ये अनेकांनी ते निमूटपणे सहन केले.