कोयनानगर विभागातील रासाटी येथून पाऊलवाटेने नानेल या आपल्या गावाला जाणार्या एकनाथ जाधव या शेतमजुरावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गव्याने पोटात शिंग खुपसल्याने एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली.
मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले तारळे (ता. पाटण) येथील महेंद्र दत्तात्रय जाधव यांचे पोलिस प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.
नावडी वसाहत (ता.पाटण) येथे बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे बिबट्याने एक शेळी ठार केली. जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हा हल्ला केला. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेत आहेत.