सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सार्वजनिक ठिकाणी भांडणे करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षी माने, ऐश्वर्या जाधव, सविता अवघडे, ओमकार फडतरे (रा. चंदननगर, सातारा) यांच्या विरुध्द पोलीस दिपक गुरव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 12 सप्टेबर रोजी एमआयडीसी चौकीबाहेर संबंधित सर्वजण भांडत होते. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर आपआपसात भांडणे करुन ओरडत होते.