सातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणांहून दुचाकी चोर्या केल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद दाखल झाली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणांहून दुचाकी चोर्या केल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड ता.सातारा येथून नारायण नामदेव मोरे (वय 54, रा.वडूथ ता.सातारा) यांची एमएच 11 बीएफ 1974 या क्रमांकाची दुचाकी चोरी झाली आहे.
दुसर्या घटनेत सेव्हन स्टार समोरुन हिंदुराव गणपती इंगवले (वय 62, रा. नेले किडगाव ता.सातारा) यांची एमएच 11 सीए 1822 या क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली आहे.