दोन दुचाकींची समोरासमोर धडक

पारगाव- खंडाळा महामार्गावरील सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
खंडाळा : पारगाव- खंडाळा महामार्गावरील सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
रामनरेश रामजी यादव (वय ३०, रा. केसुर्डी फाटा, ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे, तर रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव (दोघे रा. पारगाव, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, महामार्गावरील केसुर्डी व पारगावदरम्यानच्या सेवा रस्त्यावर भरधाव आलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले, तर रामनरेश यादव हे जागेवरच ठार झाले. ते जयभवानी हॉटेलमध्ये कर्मचारी होते. या अपघातात पारगावचे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची फिर्याद सूरज ज्ञानेश्वर यादव यांनी दिली.