चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर, ता. सातारा येथील पंजाब दरबार हॉटेलच्या गेट जवळ शहाबाग शनु बेग रा. यादोगोपाळ पेठ, सातारा आणि त्यांचे मित्र विशाल मोदी, रोहित सागर, उदय सागर यांना मारहाण केल्याप्रकरणी शुभम संजय खामकर, आदित्य शैलेंद्र देसके, यश किशोर चव्हाण, आशिष महादेव ननावरे, निखिल मोहन साळुंखे, सुशांत संजय खामकर सर्व राहणार एमआयडीसी सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.