न्यु इंग्लिश स्कूल सातारा या शाळेला दैदीप्यमान शैक्षणिक परंपरा असून शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आले.
सातारा : न्यु इंग्लिश स्कूल सातारा या शाळेला दैदीप्यमान शैक्षणिक परंपरा असून शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेले 'गुरुवर्य देवधर स्मृतीस्थळ' तसेच दाबके कुटुंबीयांच्या दातृत्वातून साकारले जाणारे 'दाबके प्रेक्षागृह विद्यार्थ्यांना सदैव प्रेरित करत राहतील', असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोकराव पलांडे यांनी न्यू इंग्लिश स्कूल शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मृतीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठ चे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह आनंद काटीकर, शालेय समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, विश्वस्त अनंत जोशी, परिषद सदस्य सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे, रा.स्व. संघ जिल्हाकार्यवाह मुकुंदराव आफळे, मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील, रवींद्र ब्रम्हनाळकर, नारायण आपटे, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सचिन खेडेकर, पूर्व सदस्य श्री अशोकराव वाळिंबे, डॉ संजीव गोखले, वसंतराव फडतरे, निळकंठ पालेकर, सीए. आशुतोष दाबके, माधव सारडा, सुहास रानडे कल्याण राक्षे, दाबके कुटुंबीय, माजी शिक्षक, उपशालाप्रमुख श्रीमती. विनया कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.जनार्दन नाईक, सौ. अनिता कदम, सौ. कविता गायकवाड, राजेश सातपुते, पालक प्रतिनिधी सौ.अवंती ठोंबरे, मान्यवर निमंत्रित व बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या औचित्याने शाळेचे माजी विद्यार्थी आशुतोष दाबके यांनी दाबके ट्रस्टचा माध्यमातून शाळेतील प्रेक्षागृह नूतनीकरणासाठी 50 लाख रुपयांची देणगी दिली. शाळेला सोलार ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी 1983 बॅचने शाळेला 2 लाख 72 हजार तर 2004 च्या बेंचने शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य त्याचबरोबर 2 लाख 06 हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात दिला.
याप्रसंगी प्रास्ताविकात शालेय समिती अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांनी न्यू इंग्लिश स्कूलचा सव्वाशे वर्षांचा धावता आढावा घेऊन साताऱ्यातील शैक्षणिक जडणघडणीतील न्यू इंग्लिश स्कूलचे महत्त्वाचे अधोरेखित केले. शाळेचे संस्थापक सुप्रीटेंडन्ट गुरुवर्य सीतारामपंत गणेश देवधर यांचे शाळा उभी करण्याच्या योगदानाचे देखील स्मरण केले. हीच परंपरा कायम ठेवून भविष्यात न्यू इंग्लिश स्कूल आश्वासक वाटचाल करत उद्याची पिढी घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी डे.ए.सो पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य म्हणाले की, 'दीडशे वर्षाच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीत विद्यापीठाची स्थापना हा महत्त्वाचा टप्पा आहे. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना उद्याची आव्हाने पेलण्यासाठी बळ देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी संस्था करेल, असा विश्वास व्यक्त करीत न्यू इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी असण्याबाबतचा अभिमान व्यक्त केला.
याप्रसंगी अनंतराव जोशी यांनी आपल्या मनोगतात दात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर कार्यवाह श्री आनंद काटीकर यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या शुभेच्छा वाचनासह आपले विचार मांडले.
शिक्षक प्रतिनिधी श्रीनिवास कल्याणकर यांनी साकारलेल्या शाळेच्या 125 वर्षाचा संक्षिप्त इतिहास व स्मरणीय महोत्सवांचा इतिहास 2 फलकांचे अनावरण तसेच पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी लोकमान्य टिळकांच्या 75 माध्यमातून 75 प्रकारे रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश सभागृहात करण्यात आले. 125 वर्षांची दगडी शाळेची ऐतिहासिक इमारत आणि गुरुवर्य देवधर यांची प्रतिमा एकत्र करून विशिष्ट घडी कामातून नावीन्यपूर्ण थ्रीडी पेंटिंग शाळेतील कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांनी साकारलेल्या चित्राकृतीचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील यांनी तर मान्यवरांचा परिचय श्रीमती विनया कुलकर्णी यांनी केला. सर्व मान्यवरांचे स्वागत एन.सी.सी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या ट्रूपने मानवंदना देवून केले. शाळेच्या प्रांगणात साकारण्यात आलेल्या गुरुवर्य देवधर यांचा अर्धाकृती पुतळा शाळेचा माजी विद्यार्थी मंदार महेश लोहार याने घडवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली महाडिक यांनी केले तर राजेश सातपुते यांनी आभार मानले.