प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या सुमारे साडेसात तोळ्यांच्या मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या सुमारे साडेसात तोळ्यांच्या मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुर्ला ते सातारा एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्याने महिलेचे 73.100 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 8 सप्टेबर रोजी घडली असून याप्रकरणी रुपाली प्रशांत जाधव (वय 39, रा. वाढे ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.