कोर्ट आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : कोर्ट आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोर्टाचे आदेश असतानाही सील केलेल्या घरात प्रवेश केल्याप्रकरणी उल्हास शिखरे व शुभांगी शिखरे (रा. संगममाहुली ता.सातारा) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिपक लक्ष्मण कोले (वय 36, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.