हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ओमकार कृष्णात देटके रा. गोडोली ता. सातारा, विकी रमाकांत उंबरे रा. कोडोली सातारा, जितेंद्र ताजमल शहा रा. शाहूनगर गोडोली सातारा, शोएब मोहम्मद हुसेन रा. करंजे सातारा, जीवन शहाजी रावते रा. दत्तनगर कोडोली सातारा, योगेश अरुण नाईकनवरे रा. गोडोली सातारा, जितेंद्र लादीमल शहा रा. गोडोली सातारा आणि विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे रा. रविवार पेठ पोवई नाका सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.