युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करत विनयभंग करुन तिची पर्स चोरी केल्याप्रकरणी आकाश घाडगे याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करत विनयभंग करुन तिची पर्स चोरी केल्याप्रकरणी आकाश घाडगे याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 11 सप्टेबर रोजी देगाव फाटा तसेच गोडोली रस्ता या ठिकाणी घडली आहे. युवती कॉलेजला निघालेली होती. त्यावेळी युवकाने दुचाकीवरुन तिचा पाठलाग करत रस्त्यावर दोन ठिकाणी तिला थांबवून ‘मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. दुचाकीवर बस,’ असे म्हणत युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर संशयित युवकाने 2100 रुपयांचे साहित्य असलेली पर्स जबरदस्तीने चोरुन नेली. या घटनेने युवती घाबरली. घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.