द्रोण देसाई.… हे नाव क्रिकेट विश्वात अचानक चर्चेत आले आहे, कारण आहे तुफानी फलंदाजी. या 18 वर्षीय क्रिकेटपटूने एका डावात 498 धावा केल्या. सेंट झेवियर्स (लोयोला)कडून खेळणाऱ्या द्रोण देसाईने या स्पर्धेत 498 धावांची अप्रतिम खेळी खेळून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
सविस्तर वृत्तभारत बांग्लादेश यांच्यामधील सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीनी मैदानावर कहर केला आहे. पहिल्या इनिंगमध्ये रविचंद्रन अश्विनने शतक ठोकळ. रविचंद्रन अश्विनने १३३ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी खेळली तर रवींद्र जडेजाने सुद्धा ८६ धावांची महत्वाचा खेळ संघासाठी खेळला.
सविस्तर वृत्तकेंद्र शासनाच्या वतीने खेलो इंडीया ही योजना प्रतिभावंत खेळाडु तयार व्हावेत म्हणुन देशभर राबविली जाते. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या योजनेर्तंगत जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती शाहु क्रिडा संकुल सातारा येथे सुरु आहे.
सविस्तर वृत्तउमेदीच्या काळात कसून केलेला व्यायाम आणि त्याला चौरस आहाराची दिलेली जोड यामुळे आजही वयाच्या 100 या वर्षांमध्ये मी तंदुरुस्त आहे. या शताब्दी वर्षांमध्ये अनेक स्वप्न पूर्ण झाली, काही स्वप्न बाकी आहेत.
सविस्तर वृत्तमूळचे साताऱ्याचे असणारे पण सध्या दिल्ली येथे स्थायिक झालेले वैभव आगाशे हे नावाजलेले क्रीडा समुपदेशक आहे. त्यांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असणारे मेंटल ट्रेनिंग देऊन या स्पर्धकाला उत्तेजन दिले. आणि मग या तरुणाने ऑलिम्पिक स्पर्धेमधील नेमबाजीसाठी ब्रांझ पदक मिळवले. आणि साताऱ्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवला.
सविस्तर वृत्तदुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघ आमनेसामने आहेत. इंडिया बी संघाची नाजूक स्थिती असताना एकटा मुशीर खान शुबमन गिलच्या इंडिया ए संघावर भारी पडला. 94 धावांवर 7 विकेट अशी स्थिती होती. त्यामुळे इंडिया बी संघ फार फार तर 150 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होतं. पण भलतंच घडलं.
सविस्तर वृत्तटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल द्रविडच्या हाती पुन्हा एकदा मोठी जबाबदारी पडली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसोबत करार केला आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार त्याने फ्रेचायझीसोबत आपलं कामंही सुरु केलं आहे.
सविस्तर वृत्तसातारा हिल मॅरेथॉन ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन आहे. साधारण १३ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे, याचा आनंद वाटतोय, असे प्रतिपादन खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सविस्तर वृत्तयेथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटी के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी शिकणाऱ्या श्लोक विक्रम घोरपडेने आपल्या एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप रेसिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची शृंखला कायम ठेवली आहे.
सविस्तर वृत्तटीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कायम हसत आपल्या जिगरबाज खेळीने सामने एकट्याच्या दमावर खेचून आणणारा गब्बर आता मैदानात दिसणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने भावनिक पोस्च केली आहे.
सविस्तर वृत्त