पहलगाम हल्ल्याविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुण्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनानी आंदोलनाद्वारे निषेध केला.
पुणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुण्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनानी आंदोलनाद्वारे निषेध केला. या आंदोलनामध्ये आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या देशबांधवाना श्रद्धांजली वाहिली. पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ” असे मत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.
गुलाबो गँग यांच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्यांना बालगंधर्व चौकात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली देण्यात आली. या हल्ल्यास तीव्र निषेध केला गेला. दरम्यान संगीता तिवारी, सुनिता आव्हाळ, सुनिता निमूर मनीषा गायकवाड उपस्थित होते.
तर दुसरीकडे बालगंधर्व चौकात जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपास या हल्ल्याचा दोष देत या हल्ल्यास जाहीर निषेध केला. यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले “पाकिस्तानच्या विरोधात अतिशय नियोजनबद्ध अतिरेक्यांतर्फे हल्ला करण्यात आला आहे काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्यवस्था नव्हती याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला। पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी या हल्ल्यामागच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील जे पर्यटक यातील या हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे उबाठा गटाने आंदोलन केले. “भारतातील नागरिक भारतात जर सुरक्षित नसतील आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना इथे येऊन सुरक्षित राहणार असतील तर अश्या असक्षम मोदी सरकारने तत्पर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली . यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देताना देशाचे गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या “ ही आंदोलनात मागणी केली आणि निषेध नोंदवला . आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, आणि नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही या हल्ल्याचा निषेध करत गुडलक चौक येथे आंदोलन केले. दरम्यान आतंकवादी पुतळा व पाकिस्तानचे झेंडे जाण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया राज्यसचिव अशी साबळे पाटील शहराध्यक्ष महेश भोईबार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने श्रीनगरला रवाना
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत.एकनाथ शिंदे रात्री ८ पर्यंत श्रीनगरला पोचणार असल्याचे समजते आहे. तिथे जाऊन महाराष्ट्रातील अडकेलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत. पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.