महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 79 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाची सोडत दि. 23 एप्रिल 2025 रोजी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये खादी ग्रामद्योग मंडळ मध संचालनालय सभागृह, महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.
सातारा : महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 79 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाची सोडत दि. 23 एप्रिल 2025 रोजी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये खादी ग्रामद्योग मंडळ मध संचालनालय सभागृह, महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.
एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांची पदे अनु. जाती- एकूण 06 (3 महिला व 3 खुला) अनु. जमाती साठी एकुण 5 (3) महिला व 2 खुला), ना.मा.प्र साठी एकुण 21 (11 महिला व 10 खुला), सर्वसाधारण साठी एकुण 47 (24 महिला व 23 खुला) इतकी पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सोडतीद्वारे अनु.जाती महिला शिदी, गुरेघर, गोडवली (एकूण-3),रेणोशी, वानवली तर्फ सोळशी, राजपुरी (एकूण-3), अनु. जमाती महिला- माचुतर, सौंदरी, उचाट (एकूण-3), अनु. जमाती- आमशी व भोसे (एकूण-2),नागरिकांचा मागास प्रवर्ग -1. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पिंपरी तर्फ तांब, मेटगुताड, अहिर, आकल्पे, मिलार, कोट्रोशी, बिरवाडी, आरय, तळदेव, पारपार, दुधगाव (एकूण-11), दांडेघर, झांजवड, येणे बु, कुमठे, कुंभरोशी, पाली तर्फ आटेगाव, कुरोशी, वेंगळे, चतुरबेट, गोगवे (एकूण 10), सर्वसाधारण -1. सर्वसाधारण महिला भेकवली, कासवंड, नार्किदा, आचली, देवसरे, शिरवली, वाळणे, कळमगाव, दाभेदाभेकर, देवळी, रुळे, वारसोळी देव, जावली, मांघर, निवळी, रामेघर, खरोशी, दाभेदाभेमोहन, खिंगर, क्षेत्र महाबळेश्वर, मोळेश्वर, घावरी, पारुट, आंब्रळ (एकूण 24), मोरणी, एरंडल, मेटतळे, हरचंदी, सोनाट, गावढोशी, अवकाळी, गोरोशी, भिमनगर, दानवली, उंबरी, तायघाट, पांगारी, वेळापुर, खांबील चोरगे, वलवण, हातलोट, सालोशी, चिखली, लाखवङ, पर्वत तर्फ वाघवळे, बिरमणी, लामज (एकूण 23) सरपंच पदे निश्चित करून जाहीर केले.
सरपंच आरक्षण सोडतीची प्रस्तावना निवासी नायब तहसिलदार दिपक सोनावले यांनी केली. सर्व सरपंच आरक्षणाचे कामकाज नायब तहसिलदार विनोद सावंत महसूल, निवडणूक नायब तहसिलदार जहिदा शेख, तसेच कार्यालयातील महसूल अधिकारी हेमंत सुळ सहा., महसूल सहाय्यक केशव नांदेडकर व इतर सर्व महसूल कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
सरपंच आरक्षण कार्यक्रमास सर्व गावांचे ग्रामस्थ, सरपंच, राजकीय पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम अधिकारी उपस्थित होते.