उत्तराखंडच्या रणवीरसिंहचा २ हजार किलोमीटर सायकल प्रवास

उत्तराखंडवरून २४ डिसेंबर २०२४ ला सायकलीवर निघालेल्या रणवीरसिंह याने सायकलवरून दोन हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर केले आहेत.
महाबळेश्वर : उत्तराखंडवरून २४ डिसेंबर २०२४ ला सायकलीवर निघालेल्या रणवीरसिंह याने सायकलवरून दोन हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर केले आहेत. त्याचे नुकतेच महाबळेश्वरकरांनी स्वागत केले.
रणवीर सिंह हा उधमसिंहनगर जिल्ह्यातील सकैनिया गावाचा रहिवासी असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० किल्ले सर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणवीरने २४ डिसेंबरला सायकल प्रवास सुरू केला. सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर कापत तो महाबळेश्वरमध्ये दाखल झाला.
या वेळी बाळासाहेब पांचाळ, सचिन जंगम, श्याम तांबे, प्रकाश जाधव, विकास शिंदे, मयूर दवे, राजेश सोंडकर आदींनी रणवीर सिंहचा सन्मान करून त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.