महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकारांची दुसरी फेरी उद्यापासून सातारमध्ये

महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी लिव या वाहिनीवरील सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे.
सातारा : महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी लिव या वाहिनीवरील सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून 108 कीर्तनकारांसह हा शो सुरु झाला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी, सोलापूर या जिल्ह्यांतील 42 कीर्तनकार दुसर्या भागात पोहोचले आहेत. या भागाचे प्रत्यक्ष चित्रीकरण रविवारपासून तीन दिवस येथील शाहू कलामंदिर येथे सुरू होत आहे, अशी माहिती सोनी वाहिनीची सीनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके, दिग्दर्शक निर्माते प्रतिक कोल्हे व निर्माण देवेंद्र पानसरे यांनी दिली.
फाळके पुढे म्हणाले, सोनी मराठी वाहिनीचा हा कार्यक्रम सुरू करण्यामागे महाराष्ट्राची समृद्ध कीर्तनपरंपरा वृद्धिंगत करणे हा आहे. महाराष्ट्रातून या शो ला प्रतिसाद मिळत आहे. कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार या माध्यमातून महाराष्ट्रातील कीर्तनकार राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत. सोनी लिव वाहिनीने कीर्तनकार यासाठी रियालिटी शोचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दुसर्या भागाचे चित्रीकरण सातार्यात रविवारपासून सुरू होत आहे.
सकाळी दहा ते दोन व सायंकाळी चार ते नऊ असे तीन दिवस हे चित्रीकरण चालणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी, सोलापूर व संभाजीनगर येथील 42 कीर्तनकार हे दुसर्या फेरीत पोहोचले आहेतए तर सातार्यातीलच 12 कीर्तनकारांचा यात समावेश आहे. हरिभक्त परायण राधाताई सानप व ह भ प जगन्नाथ महाराज पाटील हे या शोचे प्रमुख परीक्षक आहेत.