कराडमध्ये खंडणीसाठी हल्ला

रिक्षा चालकावर खंडणीसाठी गुंडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ घडली.
कराड : रिक्षा चालकावर खंडणीसाठी गुंडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ घडली.
बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला. याबाबत आरिफ हारून मुजावर (रा. कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून जुनेद रियाज मुजावर (रा. शिवाजी चौक, मलकापूर, कराड) याच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.