महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.गृहमंत्र्यांच्या या आदेशानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आली. या हल्ल्यानंतर, भारत सरकारने प्रथम भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगित केला. . भारताने पाकिस्तानला औपचारिक पत्र लिहून सिंधू पाणी करार स्थगित केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत महाराष्ट्र सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान आता महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये सिंधू पाणी करार पुढे ढकलण्याचा निर्णयही समाविष्ट होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० पासून सिंधू पाणी करार लागू आहे. सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनरेखा मानली जाते. २१ कोटींहून अधिक लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर अवलंबून आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत महाराष्ट्र सोडण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यापैकी जास्तीत जास्त ६ पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केली आहे. ही यादी पोलिस ठाण्यांना देण्यात आली आहे. पाकिस्तानी व्हिसा असलेला कोणीही येथे ४८ तासांपेक्षा जास्त काळ राहू नये यावर लक्ष ठेवले जाईल. यानंतरही जर लोक थांबले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे १८ प्रकारचे सर्व व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर, अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना शोधून ते तातडीने तिथे जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
अमित शहांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. राज्यातील ४८ शहरांमध्ये एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. तर नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी आणि ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक आढळले. मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त ५१ पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रे मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय.
सध्या महाराष्ट्रात ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रजसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांच्या व्हीजाची मुदत संपलीय. भारतीय एजन्सी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांना पाकिस्तानात परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही किंवा सापडत नाहीयेत अशी हे पाकिस्तानी लोक आहेत, असं योगेश कदम यांनी सांगितले. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टाईम व्हिसा असलेल्यांना फक्त दोन दिवसांत म्हणजे २८ तारखेपर्यंत भारत सोडण्यास सांगितले जाते. ज्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत त्यांना दोन दिवसांची मुदतवाढ दिली जाईल. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत देश सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणं अजुन सुरु आहे. त्यामुळे आकडेवारी बदलू शकते, असंही योगेश कदम म्हणाले.