साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातारचे सुपुत्र अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार दि 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता शाहू कला मंदिर मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
सातारा : साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातारचे सुपुत्र अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार दि 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता शाहू कला मंदिर मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी अरुण गोडबोले व अनुपमा गोडबोले या दोघांचा अभिष्टचिंतन स्नेहमेळावा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर असणार असून समर्थभक्त योगेश बुवा रामदासी, ज्येष्ठ विचारवंत डॉ दत्तप्रसाद दाभोळकर, अभिनेते राहुल सोलापूरकर, कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दुपारी 4:30 ते 10:30 या कालावधीमध्ये ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषा पाटील यांचा अभंग रंग हा कार्यक्रम होणार आहे. 6:30 ते 8:15 या कालावधीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा होणार असून यावेळी अरुण गोडबोले यांनी लिहिलेले "सकल करणे जगदीशाचे " हे आत्मचरित्र आणि " पारिजात " या कवितासंग्रहाचे प्रकाशनही होणार आहे.
कार्यक्रमाला समस्त सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोडबोले कुटुंबीय आणि अरुण गोडबोले मित्र मंडळ यांनी केले आहे.