मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर ये तालुका सातारा येथील कन्हेर कॅनॉल येथे काशिनाथ धोंडीबा पाचंगे राहणार वर्ये, ता. सातारा यांना समीर काळे, सुरेश चव्हाण, समाधान काळे, विवेक चव्हाण, उदय काळे (पूर्ण नावे माहीत नाहीत) आणि इतर तीन अनोळखी (सर्व राहणार नवनाथ नगर, तालुका सातारा) यांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दुसरी तक्रार विवेक मोहन काळे रा. नवनाथ नगर तालुका सातारा यांनी दिली आहे. त्यानुसार विवेक काळे यांना अजय मिठारे, रोहन लष्करे, काशिनाथ पाचंगे, हर्षद तांबोळी (पूर्ण नाव माहिती नाही) आणि इतर आठ ते दहा जणांनी (सर्व रा. इंदिरानगर, पानमळेवाडी, ता. सातारा) लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.