दोन्ही बाबांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केल्याची जाण आणि भान सर्वसामान्य कुटुंबाला झालेली आहे आणि मला खात्री आहे, आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार आहेत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे कराड दक्षिण चे उमेदवार संजय गाडे यांनी केले.
सातारा : दोन्ही बाबांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केल्याची जाण आणि भान सर्वसामान्य कुटुंबाला झालेली आहे आणि मला खात्री आहे, आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार आहेत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे कराड दक्षिण चे उमेदवार संजय गाडे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे कराड दक्षिण चे उमेदवार संजय गाडे यांनी उमेदवारी अर्ज भव्य शक्तीप्रदर्शनाने दाखल केला. कराड शहरामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी वंचित आघाडीचे महासचिव गणेश भिसे, शरद गाडे, भिमराव घोरपडे, अरविंद आढाव, विशाल कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय कोंडीबा गाडे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी संजय गाडे यांना कराड दक्षिण मधून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय निकराची लढाई होणार आहे आणि आम्ही त्या पद्धतीने ही लढाई जिंकू, यशस्वी होऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे, असा विश्वास शरद गाडे यांनी बोलून दाखवला.
यावेळी बोलताना वंचित आघाडीचे महासचिव गणेश भिसे म्हणाले, राज्यामध्ये य प्रस्तावित पक्ष आहेत कॉंग्रेस असेल बीजेपी असेल शिवसेना असेल दोन्ही अजित पवार साहेब असतील सर्व पक्षांचे जर उमेदवार पाहिले तर यामध्ये फक्त घराणेशाही दिसून येते. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी फक्त काय सतरंज्या उचलायच्यात का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण राज्यांमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे वतीने विचारत आहोत. या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण ही भूमिका घेऊन या ठिकाणी एससी, एसटी आणि ओबीसी या समूहाला प्रतिनिधित्व देण्यासाठीची आमची लढाई आहे आणि याचाच भाग म्हणून आज आम्ही संजय कोंडीबा गाडे यांचा उमेदवारी अर्ज याठिकाणी दाखल केलेला आहे. राज्यामधील प्रमुख प्रश्न पहिला तर आरक्षण विरोधी आणि आरक्षणाच्या बाजूने अशी लढाई संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या राज्यामधील एससी, एसटी ओबीसी, अल्पसंख्यांक समुदायाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ आम्ही आज ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आम्हाला सार्थ विश्वास आहे की, या ठिकाणी या दोन्ही बाबा आहेत. या दोन्ही बाबांना पाडून संजय गाडे निवडून येतील. आज कराडकर दक्षिणेतील जनतेला आम्ही आज या ठिकाणी आव्हान करतोय की आपण आरक्षणाच्या, समतेच्या, न्यायाच्या बाजूने आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ गॅस सिलेंडर या चिन्हाच्या समोरील बटन दाबून गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय गाडे म्हणाले की, प्रस्थापितांनी संपत्ती मिळवली. तरीही त्यांची राजकीय अभिलाषा पूर्ण झालेली दिसून येत नाही. मराठा समाजाच्या जीवावर सत्ताधारी जमात म्हणून राजकारण करून 53 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये शिक्षण सम्राट झाले, कारखानदार झाले. मात्र, गरीब गरजू मराठ्यांची काही टक्केवारीची मुलं आपल्या कारखान्यात असावीत, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये असावीत, आपल्या दवाखान्यात असावीत, असे या दोन्ही बाबांना वाटले नाही. त्यामुळे या दोन्ही बाबांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केल्याची जाण आणि भान सर्वसामान्य कुटुंबाला झालेली आहे आणि मला खात्री आहे, आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांना चालतं. मात्र आंबेडकर हे नाव चालत नाही. त्यावेळेलाही आंबेडकर या नावानेच भारताला वाचवले होते, आताही तसेच घडेल, असे ते म्हणाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.