दहिवडी (ता.माण) येथून माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा : दहिवडी (ता.माण) येथून माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, 2009 पासून आजपर्यंत मला प्रत्येक निवडणूकीत माण - खटावच्या जनतेने भरभरून प्रेम आणि आशिर्वाद दिले आहेत. दुष्काळाचा कलंक पुसण्याचा शब्द मी उरमोडी, जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून अंतिम टप्प्यात आणला आहे. मतदारसंघात मी शब्द दिल्याप्रमाणे कॅनॉलचे पाणी आले आहे. आता माण-खटावमध्ये दुष्काळाचा कलंक पुसून ऊसाची बागायती शेती होत आहे. कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आता होत असलेली निवडणूक दुष्काळाचा कलंक पुसण्याची अंतिम निवडणूक आहे. याच मातीने सर्वसामान्य कुटुंबातील जयकुमारला तीन वेळा आमदार केले आहे. जोपर्यंत जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच अडवू शकत नाही. मी जनतेची सेवा करतोय, दिलेले शब्द पूर्ण करतोय. त्यामुळे मी निवडणूकीत उभा राहिलो कि आमदार नक्कीच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.