एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर डॉ. अमितकुमार अर्जुन सोंडगे रा. बेलापूर, जि. ठाणे यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी मारहाण करून त्यांच्याकडील साठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी चोरी करून नेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.