एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उसतोडणीसाठी कामगार देतो, असे सांगून 7 लाख 30 हजार रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी अनिल बंडू धोतरे (रा.टाकरवन ता.माजलगाव जि. बीड) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रमोद जनार्दन चव्हाण (वय 56, रा. महागाव ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2020 साली घडली आहे. संशयिताने 7 कोयते म्हणजेच 14 उसतोड कामगार देतो, असे सांगून 7 लाख 30 हजार रुपयांची एनएफटी करुन घेतली आहे.