एकास खोट्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास खोट्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण सिंग राहणार राधिका रोड सातारा यांचा पूजा रामचंद्र बनसोडे यांना धक्का लागलेला नसताना देखील धक्का लागल्याच्या कारणावरून पूजा बनसोडे आणि इतर अनोळखी तीन जणांनी लक्ष्मण सिंग यांना वायफरच्या लोखंडी पाईपने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.