सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्थानकातून सुरज शुक्राचार्य साबळे रा. शिवथर, ता. सातारा यांच्या वडिलांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, संतोष वसंत दिसले रा. निगडी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांचा एमआय कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.